Inflation म्हणजे महागाई हा शब्द तुम्ही ऐकलं असेल पण Shrinkflation म्हणजे काय ते माहिती आहे का ?
Shrink म्हणजे आकसने , जेव्हा एखाद्या उत्पादनाची किंमत वाढवण्याच्या ऐवजी कंपन्या किंमत तीच ठेवतात मात्र प्रॉडक्ट च वजन घटवतात त्याला म्हणतात Shrinkflation.
म्हणजे होत काय , तर बिस्किटाचा पुडा , इन्स्टंट नूडल्स, किंवा चिप्स च्या पाकिटाची किंमत आणि पाकिटाचा कार तोच राहतो पण त्या किंतातीत ग्राहकांना आधीच्या वजनापेक्षा कमी गोष्टी मिळतात,
म्हणजे बिकिटांची संख्या कमी होते चिप्स कमी होतात आणि पॅकेट मधली हवा वाढते. किंवा कोल्डड्रिंक ची बाटली तेवढीच दिसली तरी मिलिलिटर हे कमी झालेले असते.
भाववाढ करायचा हा एक छुपा मार्ग आहे आणि जगभरातल्या फँटसिग कंपन्या हा मार्ग वापरतायत .
कारण वस्तूंच्या किमतीबद्दल ग्राहक जागरूक असतात, किंमत थेट वाढवली तर ते प्रत्येक गाहकांच्या लक्षात येणार असत. त्याचा थेट परिणाम हा उत्पदादानाच्या विक्रीवर होतो.
पण प्रत्येक पॅकबंद उत्पादनाच्या वजन कडे इतक बारकाईने पहिला जात नाही.
Shrinkflation सध्या चर्चेत आहे कारण Carrefour या फ्रेंच सुपर मार्केट ने त्यांच्याकडे विकायला असणाऱ्या सगळ्या उत्पादनांवर स्टिकर्स लावलेत ज्यांनी किंमत तीच ठेवत वजन घटवलंय.
जगभरात महागाई वाढतेय , कच्च्या मालाच्या किमती वाढतायेत त्यामुळे कंपन्यांना ह भार ग्राहकांकडे सरकवावा लागणार आहे.
यासाठी आणखी एक मार्ग निवडला जातोय तो म्हणजे महाग घटकांचं प्रमाण कमी करून स्वस्त घटकांचं प्रमाण वाढवणे. याला म्हंटलं जातंय Skimpflation.
त्यामुळे यापुढे उत्पादने विकत घेताना किंमत आणि एक्सपिरी देत सोबतच वजन आणि त्यातल्या घटकांचं अप्रमाण पाहायलाही विसरू नका.
वीर मराठी