Aditya L1 mahiti
चंद्रावर चांद्रयान ३ यशस्वीरीत्या पोहोचवल्या नंतर आता इसरो च पूर्ण लक्ष आहे सूर्याकडे. २ सप्टेंबर २०२३ ;या आदित्य एल १ हि मोहीम लॉन्च करण्याचा इसरो च बेत आहे. पण आपण आता सूर्याकडे का जातोय ? त्याचा अभ्यास का आवश्यक आहे ? आणि आजवर कोणी कोणी सूर्याकडे जणांच्या मोहीम राबवल्या आहेत . हे सर्व जाणून घेणार आहोत आपण आज या आर्टिकल मध्ये.
चांद्रयान ३ च्या यशाने इसरो तील शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढला आहे. तिथे चंद्रावरून लॅण्डरआणि प्रज्ञान रोव्हर दररोज नवनवीन चित्रे आणि डेटा पृथीवर पाठवत आहेत.
पण आता आदियुर एल १ सूर्याची नवीन रहस्य उलगडण्याचा प्रयंत्न करेल. या आदित्य एल १ यानासोबत ७ पेलोड पाठवले जातील. त्यापैकी ४ उपकरण सूर्यावर लक्ष ठेवतील, आणि बाकी ३ उपकरण लेगरोंज १ या अवकाशातल्या बिंदू भोवतीच्या कणांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करतील.
आत हा लेगरोंज बिंदू काय आहे?
यान थेट सूर्याजवळ पाठवण्यासाठी जास्त इंधन लागत पण ल१ पॉईंट जवळ गुरुत्वाकर्षणाच्या आधारे यान कक्षेत ठेवता येत. आदित्य एल १ हे यान या बिंदू भोवती स्थिर राहणार नाही तर या बिंदू भोवती फिरत राहणार आहे. अशा कक्षेला हॅलो ऑर्बिट असा म्हणतात.
खरंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी या पूर्वीही जगभरातून अनेक अंतराळ मोहीम पाठवण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या नासाने १९६० च्या दशकात पायोनियर कार्यक्रमा अंतर्गत वेगवेगळ्या ग्रहांमधल्या,अवकाशामधल्या,सौर्य वारे, रेडिएशन, सोलर फ्लेअर, चुंबकीय क्षेत्र इत्यादींचा अभ्यास करायला सुरवात केली.
मग ७४ ते ८५ दरम्यान नासा आणि जर्मन एरो सपाचे एजेन्सी ने हेलिओस १ आणि हेलिओस २ या यानांनी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालून निरीक्षण नोंदवली.
१९९४ -९५ दर्म्यन युरोपिअन सपाचे एजेन्सी आणि नासाने युलिसास हे यान सूर्याकडे पाठवलं ज्याने १८ वर्ष सूर्याभोवती प्रदक्षिणा घालून माहिती गोळा केली.
याशिवाय नासा ने सूर्याच्या अभाष्यासाठी आतापर्यंत सोलर अँड हेलिओस्फेरिक ओबेअरवेटरी , पारकर सोलर प्रोब, आणि इंटरफेस रिजन इमेजिंग स्पेक्टरोग्राफ या ३ मुख्य मोहिमा राबवल्या आहेत.
याशिवाय चीन ने कुवफू १ हि आणि रशिया ने कोरोनास फोटॉन असे काही उपग्रह सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात सोडले आहेत.

पण प्रश्न असा पडतो एवढ्या सगळ्या मोहिमा सूर्याचा काय अभ्यास करणार?
सूर्याचा अभ्यास का महत्वाचा? Aditya L1 mahiti
सूर्य आपल्याला माहिती असलेला विश्वातला सर्वात महत्वाचा दुवा आहे कारण त्याचा भोवती सर्व ग्रह फिरतात.आपल्या पृथ्वी वरती दिवस रात्र,ऋतू बदल, भरती-ओहोटी असे वेगवेगळे कालचक्रही सूर्यामुळेच चालू राहतात.
मग सूर्याचा अभ्यास करून जगाच्या उत्पत्तीचा जगभरातले शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
याच एक उत्तम उदाहरण म्हणजे नासाच्या पारकर प्रोब ने लावलेला एक शोध तो म्हणजे सूर्याचे चुंबकीय क्षेत्र दर ११ वर्षांनी आपली दिशा अचानक बदलत, तेसुद्धा १८० डिग्रीने. म्हणजे सूर्याचा उत्तरीय ध्रुव दक्शिणेला जातो आणि दक्षिण ध्रुव उत्तरेला जातो.
तोसुद्धा एका झटक्यात. शास्त्रज्ञ सांगतात कि सूर्याचा आत असलेला एक डायनॅमो स्वतःला रिसेट करतो ज्यामुळे असं घडत आणि या घटनेतून प्रचंड ऊर्जा निर्माण होते. हि ऊर्जा जेव्हा उत्सर्जित होते तेव्हा सोलर फ्लेअर तयार होतात आणि उष्णतेच्या झळा बाहेर पडतात.
अशाच अधिक घटनांचा अभ्यास इसरो चे यान आदित्य एल १ करेल. सूर्य आणि पृथ्वी मधलं अंतर १५ कोटी किलोमीटर आहे. आदित्य एल १ हे पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावरून काम करेल कारण इथलं तापमान सूर्याच्या कोरोनाच्या तुलनेत कमी असेल.
भारतासाठी हि मोहीम चांद्रयान इतकीच महत्वाची का आहे. आपल्याला माहीतच आहे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा हा जगातील पहिलाच देश ठरलाय. सूर्याचा अभ्यासासाठी सुद्धा भारतासाठी हि मोहीम किती महत्वाची आहे हे सांगताना,
डॉक्टर योगेश्वरनाथ मिश्रा सांगतात
“जर भारताने इतर देशांच्या मोहिमेवर अवलंबून न राहता स्वतःची मोहीम स्वतंत्रपणे राबवली तर उभा मोहिमेत निर्माण होणारे संभाव्य अडथळे सोडवण्यासाठी भारताला इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहावं लागत नाही. भारताला स्वतंत्र सौर मोहीम अनुभवता येईल.”
अर्थात त्याच्या मते हि एक सुरवात आहे. सूर्याला समजून घ्यायला इसरो ला अशा अनेक मोहिमा अजूनही कराव्या लागतील.
Aditya L1 mahiti कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा.
आपल्या मित्रांमध्ये शेअर करा
अशा माहितीच्या अपडेट साठी खाली दिलेल्या लिंक वरून आमचा ग्रुप आणि चॅनेल जॉईन करू शकता.