चंद्रावर अणुबॉम्ब स्फोटाचा बेत

१९५० च्या दशकात अमेरिका आणि सोविएत युनियन यांच्यात शीतयुद्ध सुरु झालंतर होतच, सोबतच अंतराळ मोहिमांमध्ये सुद्धा दोघांमध्ये शर्यत सुरु झाली होती.

या शर्यतीत रशिया पुढे दिसत होता त्यामुळे अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक विचित्र योजना आखली. चंद्रावर अणुस्फोट घडवून रशिया ला घाबरवण्याची योजना.

१९६९ साली जेव्हा अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग यांनी जेव्हा चंद्रावर पहिला पाऊल टाकला होत तेव्हा त्यांच्या पाउलाच्या खुणा चंद्रावर आजही जशाच्या तशा आहेत.

मग एखाद्या अनुबॉम्बचा स्फोट झाला असता तर चंद्रावर काय झालं असतं? याविषयी खरंतर स्टडी ऑफ लुनार रिसर्च फ्लाईट पार्ट १ या संशोधनात काही गोष्टी आढळतात.

वरकरणी पाहत आहे संशोधन साधंसुधं प्रशासकीय कामापुरतं वाटतं, जणूकाही त्याकडे फारस लक्ष दिलं जाणार नाही, पण त्याच्या मुखपृष्ठावरून एक वेगळच चित्र डोळ्यांसमोर उभे राहत.

त्या मुखपृष्ठाच्या मध्यात एका अणुबॉम्ब स्फोटच मश्रुम क्लाउड दिसत. जे खरंतर न्यू मेक्सिको मधल्या एयरफोर्स वेपन्स सेंटरच चिन्ह होतं.

मश्रुम क्लाउड
मश्रुम क्लाउड

अनुशस्त्रांच्या चाचणीत त्याची भूमिका महत्त्वाची होती. या चिन्हाच्या खाली अमेरिकेतले प्रसिद्ध अणुवैज्ञानिक एल राफेल किंवा लेनर्ड रेफेल यांचं नाव होतं. ज्यांनी भौतिक शास्त्रज्ञ एनरिको फरनी यांच्याबरोबर काम केलं होतं.

फरनी यांनी जगातलं पहिलं न्यूक्लिअर रिऍक्टर तयार केलं होतं. तेव्हा प्रोजेक्ट ए ११९ या योजनेत एक अतिशय गुप्त प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

चंद्रावर हायड्रोजन बॉम्ब फोडण्याची योजना, त्याकाळी हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्ब पेक्षा जास्त विनाशकारी समजला जायचा.

बेत असा होता की हा बॉम्ब चंद्राच्या उजेड आणि अंधार या दोन्ही बाजूंच्या सीमेवर म्हणजे टर्मिनेटर लाईन वर फोडायचा, पण का? तर चंद्रावर प्रकाशाचा एक असा मोठा गोळा तयार करायचा जो कोणत्याही उपकरणाशिवाय रशियातूनही दृष्टीस पडेल. तिथे मशरूम क्लाऊड तयार होण्याची शक्यता तर कमी होती.

म्हणजे एका बाजूला या योजनेचा उद्देश चंद्राविषयीच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उकल करण्याचा होता. तर दुसरीकडे याचा मुख्य उद्देश होता शक्ती प्रदर्शनाचा.

असं लक्षात येतं की अमेरिका रशिया पेक्षा पुढे नाही या असुरक्षिततेच्या भावनेतून सुचलेली ही योजना होती. 1950 च्या दशकात शीतयुद्धाच्या काळात एक सार्वत्रिक समज असा होता की अमेरिका रशियाच्या पुढे आहे खास करून आण्विक शस्त्र तयार करण्याच्या बाबतीत.

१९५२ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेने हायड्रोजन बॉम्ब चा प्रयोग केला होता त्याच्या तीन वर्षांनंतरच रशियाने त्यांचा हायड्रोजन बॉम्ब दाखवत अमेरिकेलाही हैराण करून सोडलं होतं.

१९५७ मध्ये सोवियत युनियन ने अंतराळात झेप घेत स्फुटनिक १ ची निर्मिती केली होती. पृथ्वीच्या चारी बाजूंना फिरणारा तो पहिला उपग्रह ठरला होता.

अमेरिकेने ही कृत्रिम चंद्र तयार करण्याचा मक्ता घेतला होता पण तो प्रयोग अयशस्वी ठरला. दरम्यान अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत होत्या की ऑक्टोबर क्रांतीच्या वर्धापन दिनी म्हणजे सात नोव्हेंबरला सोवियत युनियन चंद्रावर हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची योजना आखतोय.

दुसऱ्या एका बातमीत म्हटलं गेलं होतं की सोवियत युनियन अमेरिकेच्या जवळच्या देशावर अणुअस्त्र सज्ज मिसाईल डागेल.

लक्षात घ्या तो शीतयुद्धाचा काळ होता त्यामुळे अशा अफवा कोण कुठून पसरवायचं माहिती नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भीतीने अशा योजनांचा विचारही करायला सुरुवात केली होती.

त्या प्रकल्पाचे कोड नेम इ-४ असे ठेवण्यात आलं होतं, आणि हा प्रकल्प अमेरिकेच्या योजनेची कार्बन कॉपी होता. पण नंतर सोवियत युनियन तो प्रकल्प रद्द केला, कारण तो अपयशी झाल्यास सोवियत युनियनच्या भूमीवरच हा बॉम्ब पडू शकतो, आणि त्यामुळे अतिशय भीषण अपघात होण्याचा धोका होता, आणि कदाचित या देशांना त्याकाळी कळलं असावं की असले कि असले उद्योग करण्यापेक्षा चंद्रावर उतरून दाखवणं जास्त मोठा पराक्रम ठरेल.

विज्ञान आणि आण्विक तंत्रज्ञानाच्या इतिहासावर काम करणारे अलेक्स वेलरस्टीन सांगतात की हा प्रकल्प अ११९ ही स्फुटनिकच्या प्रक्षेपणाच्या विरोधात पुढे आलेल्या अनेक कल्पनांपैकी एक योजना होती.

अंतराळ विषयक आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल बोलताना ब्लेंडीन बोवेन सांगतात की “हे खूप गंभीर संशोधन होतं मात्र त्यांना योग्य तितका पैसा आणि तसंच लक्ष दिलं गेलं नाही त्यामुळे त्यांनी अंतराळवीज्ञानातून लक्ष काढून घेतलं. हि १९५० च्या अखेरीस आणि १९६० च्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे आणि तो एक वेडेपणाचा काळ होता.”

तेव्हा अंतराळ विज्ञानाचं काय भविष्य असेल हे माहिती नव्हतं प्रोजेक्ट या A-११९ ची सविस्तर माहिती आजही एक रहस्यच आहे तसेच त्याच्या सगळ्या नोंदी सगळे रेकॉर्ड जाळले गेलेत असे सुद्धा एक शंका व्यक्त केली जाते.
यावरून एकच बोध घ्यायला हवा की ज्या संशोधनाचे नावही आकर्षक नाही अशा संशोधनांकडे दुर्लक्ष करू नये आणि ही संशोधन नक्कीच वाचायला हवीत.

माहिती कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा.
आपल्या मित्रांमध्ये शेअर करा
अशा माहितीच्या अपडेट साठी खाली दिलेल्या लिंक वरून आमचा ग्रुप आणि चॅनेल जॉईन करू शकता.

वीर मराठी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sharing Is Caring:

Leave a Comment