Nagpanchami katha 2023
मित्रांनो नागपंचमीचा सण अगदी दरवर्षी आपण मोठ्या भक्ती भावाने साजरा करतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीस नागपंचमी साजरी केली जाते .
त्यादिवशी नागांची विशेषत्वाने पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद घेतला जातो, आणि मित्रांनो असे केल्याने नागदेवतेचा आशीर्वाद आपणास मिळतो.
मात्र हा सण का साजरा केला जातो. या पाठीमागे कोणती परंपरा आहे, प्राचीन कथा कोणती आहे हे मात्र बऱ्याच कमी जणांना माहीत आहे.
आणि याच गोष्टीची माहिती आपण येथे घेणार आहोत.
मित्रांनो खरं तर या सणाची सुरुवात ही खूप प्राचीन काळापासून झालेले आहे.
राजा परीक्षित नावाचा एक राजा होऊन गेला. एकदा हा राजा परीक्षित जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेलेला असताना त्याला खूप तहान लागली.
त्यांनी पाहिले की जंगलात एक झोपडी आहे, त्या ठिकाणी एक आश्रम होता.
मित्रांनो तो आश्रम एका ऋषींचा होता ते ऋषी तपश्चर्या करत बसले होते. या राजाने तहान लागली म्हणून त्या ऋषींना जल मागितले.
मात्र तपश्चर्येला बसलेल्या ऋषींनी राजाकडे अजिबातही लक्ष दिले नाही.
हे पाहून राजाला अतिशय राग आला आणि या परीक्षित राजाने या अस्थिक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला.
जवळच उभा असलेल्या त्यांच्या मुलाने हे सर्व पाहिलं आणि त्याला अत्यंत राग आला.
तो खूप क्रोधित झाला आणि या क्रोधामध्येच त्यांनी परीक्षित राजाला श्राप दिला, की हे राजन तुला सातव्या दिवशी तक्षक नावाच्या नागाकडून सर्पदंश होईल. आणि त्यातच तुझा मृत्यू होईल.
इकडे या शापाने राजा परीक्षित खूप घाबरला, व्याकुळ झाला त्याने घरी येऊन आपल्या राजवाड्यात येऊन ही सर्व माहिती दिली.
त्याचा एक मुलगा होता जन्मजय. त्याने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी नागदाह नावाचा यज्ञ सुरू केला.
हा यज्ञ इतका प्रचंड परिणामकारक होता की या यज्ञाची सुरुवात झाल्यानंतर आजूबाजूचे सर्व साप त्या ठिकाणी येऊ लागले, आणि ते यज्ञांमध्ये स्वतःला झोकून देऊ लागले.
आणि परिणामी त्या सर्व सापांच्या आणि नागांची राख रांगोळी होऊ लागली. हे सर्व पाहून सर्व नाग समाज हा जो काही नाग समाज होता तो अत्यंत घाबरला. आणि हे सर्व घाबरलेले नाग अस्थिक ऋषींना शरण गेले.
या नागांची कहाणी ऐकल्यानंतर अस्थिक ऋषी जन्मेजयाकडे आले आणि त्यांनी सर्व परिस्थिती जन्मेजयाला समजावून सांगितली.
त्यांनी सांगितले की कशाप्रकारे राजा परीक्षितानेच मोठी चूक केलेली आहे. या चुकीची शिक्षा म्हणूनच हा श्राप त्याला मिळालेला आहे. आणि तुझ्या या वडिलांच्या चुकीसाठी तू संपूर्ण नाक समाजाचा नाश करणे अगदी चुकीचे आहे.
अस्थिक ऋषींचे म्हणणं जन्मेजयाला पटलं.
आणि मग त्याने हा नागदाह यज्ञ बंद करून उलट नागांची पूजा करण्यास सुरुवात केली. जन्मेजयाने सर्व सापांची व नागांची त्या दिवशी पूजा केली म्हणूनच या दिवसापासून नागांची पूजा करण्याची प्रथा हिंदू धर्मात सुरू झाली. आणि तो दिवस होता नागपंचमीचा. आणि म्हणूनच नागपंचमी साजरी केली जाते.