Sur Parambya In Marathi
सूरपारंब्या हा गावाकडे झाडावर खेळला जाणारा खेळ आहे. नावाप्रमाणेच यामध्ये दोन मुख्य गोष्टींचा उपयोग होतो. एक म्हणजे सूर जी एक काठी असते सर्व साधारण १ ते १.५ फूट लांब आणि पारंब्या म्हणजे पारंब्या असणारे झाड. म्हणून या खेळाचे नाव सूर पारंब्या आहे.
गावाकडील लहान मुले हा खेळ आवडीने खेळताना दिसतात. या खेळ मध्ये कितीहि खेळ गडी असू शकतात.
सूरपारंब्या खेळाचे नियम Sur Parambya In Marathi
या खेळाचे नियम अगदी सोपे आहेत. सर्व प्रथम सर्व गडी सुटतात , म्हणजे खेळाची सुरुवात कोणता गाडी करणार याची प्रक्रिया.
ज्या गाड्यावर डाव येईल तो गडी झाडाखाली उभा असतो . आणि अजून एक गडी सोडून बाकी सर्व जण झाडावर चढतात , खाली असलेला गडी आपल्या हाताने सूर म्हणजेच काठी हि जितक्या लांब फेकता येईल तितक्या लांब फेकतो. आणि डाव असलेला गडी पळत जाऊन तो सूर घेऊन येऊन झाडाखाली आखलेल्या रिंगणात ठेवतो.
सूर पळत जाऊन घेऊन येई पर्यंत सूर फेकणारा गडी झाडावर जाऊन चढतो. आणि आता खरा खेळ चालू होतो.

ज्या गाड्यावर डाव आहे तो गडी झाडावर इतर गाडयांना बॅड करण्यासाठी चढतो. आणि इतर गडी आपला बचाव करत सुरांच्या दिशेने झाडावरून खाली उतरतात.
त्याना हा सूर कोणताही गडी बाद होण्या आधी शिवायचा असतो. जर का असे झाले तर ज्या गाड्यावर डाव आहे त्याला पुन्हा डाव घ्यावा लागतो,
आणि जर का ज्या गाड्यावर डाव आहे त्याने इतर गाड्यांनी सूर शिवण्या आधी कोणत्याही गड्याला बाद केले तर, डाव हा बाद झालेल्या गड्याला घ्यावा लागतो.
सूरपारंब्या खेळाचे फायदे Sur Parambya In Marathi
या खेळामध्ये खूप शारीरिक हालचाली कराव्या लागतात , जसे पळणे, झाडावर चढणे व उतरणे, तर्क साधने, इत्यादी. ज्यामुळे लहान वयातील वाढत्या अंगाला शारीरिक हालचालीचे वळण लागते.
शरीर चपळ बनते.
सूरपारंब्या खेळाचे तोटे
हा झाडावरील खेळण्याचा खेळ असल्याने , खेळताना झाडावरून खाली पडण्याची हि भीती असते ज्यामुळे शरीराला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी शक्यतो मुले या खेळासाठी कमी उंचीचे आणि चढण्यास सोपे असणाऱ्या झाडाची निवड करतात.
काही ठिकाणी मुली सुद्धा हा खेळ खेळताना दिसतात.