zero shadow in marathi.
ही वर्षातून आपल्याला दोन वेळा अनुभवयाला मिळते. आपल्याकडे मे महिना आला की वृत्तपत्रातून किंवा आजकाल समाज माध्यम इतकी प्रभावी झाले आहेत त्यांच्यामार्फत आपण शून्य सावली दिवसाविषयी अनेकदा वाचत असतो.
काही वेळा त्याचा अनुभव पण घेतो आणि त्यामुळे आपल्या मनात या गोष्टीविषयी निर्माण होत. या कुतुलातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचं समाधान शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न.
झिरो शाडो दिवस म्हणजे नेमकं काय आहे ?
मुळात शून्य सावली दिवस म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यापूर्वी आपला काही मूलभूत गोष्टींचा ज्ञान असणे गरजेचे आहे.
सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की हा जो पृथ्वीचा आस आहे हा पृथ्वीचा आस ३० अंशांनी कललेला आहे. आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करीत असताना हा कललेला आज घेऊनच परिभ्रमण करत असते.
त्यामुळे याचा परिणाम म्हणून कर्कवृत्त व मकरवृत्त यादरम्यान सूर्याचं भासमान भ्रमण होत असतं. याच भासमान भ्रमणाला आपण सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणून देखील ओळखतो आणि पृथ्वीवर पृथ्वीवरील हवामानामध्ये जी काही स्थित्यंतरे घडतात त्याचं हे खूप प्रभावी कारण आहे.
जगाच्या नकाशात पाहायला गेलं तर हे शून्य अंश अक्षवृत्त, म्हणजे विषुववृत्त त्यानंतर हे साडे तेवीस अंश उत्तर अक्षवृत्त म्हणजे, कर्कवृत्त व हे साडे तेवीस अंश दक्षिण अक्षवृत्त म्हणजे मकरृत्त आणि याच दरम्यान कर्क आणि मकरवृत्त या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यानच सूर्याचे भासमान धर्म होत असतं.
आणि म्हणूनच शून्य सावली दिवस सुद्धा आपल्याला याच दरम्यानच्या प्रदेशात अनुभवता येतो. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आपल्यालाही घटना अनुभवता येत नाही.
भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताच्या मध्यातून हे कर्कवृत्त जातात जिथे पर्यंतच सूर्याचे भासमान भ्रमण होते. उत्तरेकडे सूर्याचे भासमान भ्रमण होत नाही आणि म्हणून हा जो उत्तर भारतीय भाग आहे या ठिकाणी आपण शून्य सावली दिवस अनुभवू शकत नाही.
कर्कवृत्ताच्या दक्षिणेला मात्र जो दक्षिण भारताचा जो भाग येतो या ठिकाणी मात्र आपण शून्य सावली दिवसाचा अनुभव घेऊ शकतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी आपण शून्य सावली दिवस अनुभवू शकतो.
या दिवशी नेमकं काय घडतं हे आता आपण पाहणार आहोत
हा सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे विषुववृत्तावरील प्रदेशात याची जी किरणं आहेत ती अतिशय लंबरूप पडतात अगदी काटकोनात पडतात म्हणून ज्या गोष्टी पृथ्वीवर काटकोनात उभे आहेत विषुववृत्तावर त्यांची सावली खाली पडत नाही.
आता शून्य सावली दिवस म्हणजे पूर्ण सावली पडत नाही असा त्याचा अर्थ नाही ती सावली असते ती बरोबर आपल्या काटकोनात पडते त्यामुळे ज्या गोष्टी उभ्या आहेत काटकोनात उभे आहेत त्यांची सावली आपल्याला दिसत नाही.
म्हणून या दिवसांना आपण शून्य सावली दिवस अस म्हणतो. प्रत्येक शून्य सावली दिवसाची तारीख देखील बदलते हे लक्षात असू द्या.
20 किंवा 21 मार्च नंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतं. सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो साधारण मे महिन्याचा कालावधी आहे. तो भारतीय भागांमध्ये प्रवेश करतो दक्षिण भारतामध्ये तो प्रवेश करतो आणि या ठिकाणी दक्षिण भारतात ही किरण जी आहेत ही लंबरूप पडतात.
आणि साहजिकच त्यामुळे आपल्याला मे महिन्यात शून्य सावली दिवस अनुभवता येतो. यानंतर पुन्हा तो 21 जून रोजी कर्कवृत्तावर येतो ज्याला आपण आयन दिन अस म्हणतो.
यानंतर पुन्हा सूर्याचा परतीचा मार्ग सुरू होतो आणि परतीच्या मार्गात पुन्हा तो भारतीय विभागावर सदर ऑगस्ट महिन्यात येतो आणि ऑगस्ट महिन्यात देखील आपल्याला शून्य सावली दिवस अनुभवता येतो.
मात्र त्याची चर्चा फारशी होताना दिसत नाही याचं कारण म्हणजे ऑगस्ट महिन्यात आपल्याकडे पावसाळ्याचा कालावधी असतो. त्यामुळे सूर्य बऱ्याचदा सूर्याचं दर्शन आपल्याला होत नाही.
यावेळी ऑगस्ट महिन्यात याची चर्चा होताना दिसत नाही. त्यानंतर सूर्य दक्षिणेकडे सरकतो आणि बरोबर इथं 22 किंवा 23 सप्टेंबर रोजी म्हणजे ज्या दिवशी ज्यावेळी शरद ऋतू असतो, भारतात त्या शरद ऋतूतील विश्व दिन ज्याला म्हटलं जातं तो 22 किंवा 23 सप्टेंबर त्या दिवशी पुन्हा तो विषुववृत्तावर येतो.